शत्रुघ्न सिन्हांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांना चोपले

शत्रुघ्न सिन्हांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांना चोपले
www.24taas.com, झी मीडिया, पाटणा

शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवणाऱ्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोप चोपले. त्यामुळे पाटणा साहेब मतदार संघात वातावरण तंग होते.

भाजप नेते आआणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. सिन्हा हे भाजपकडून पाटणा साहेब या मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना विद्यार्थ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

विरोधातील घोषणाबाजी केल्यानंतर सिन्हा यांच्या समर्थकांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यांच्या हातामधील काळे झेंडे काढून घेत मारहाण केली.

पाटणा येथील परिस्थिती हातळण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर सिन्हा, त्यांची पत्नी पूनम सिन्हा आणि मुलगा लव सिन्हा अर्ज भरण्यासाठी पुढे गेलेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 21, 2014, 16:59
First Published: Friday, March 21, 2014, 17:00
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?