शत्रुघ्न सिन्हांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांना चोपले

Last Updated: Friday, March 21, 2014, 17:00

शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवणाऱ्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोप चोपले. त्यामुळे पाटणा साहेब मतदार संघात वातावरण तंग होते.

शत्रुघ्न सिन्हांनी उत्तराखंडला दिले ५० लाख

Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:41

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून, अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ५० लाख रुपयांची मदत आज जाहीर केली आहे.

शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीला म्हटलं `राणी चोप्रा`!

Last Updated: Monday, February 11, 2013, 18:58

यशराज स्टुडिओमध्ये दिवंगत यश चोप्रा यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना शत्रुघ्न सिन्हांनी आपल्या प्रतिमेला साजेशी शॉटगन काढली आणि धमाका केला. या समारंभात शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीचा उल्लेख ‘राणी चोप्रा’ असा केला. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्यातील प्रेमसंबंधांवर शत्रुघ्न सिन्हांनी हा शेरा मारला होता.

सोनाक्षी माझ्यासारखी दिसत नाही- रीना रॉय

Last Updated: Saturday, October 13, 2012, 16:08

सोनाक्षी सिन्हा ‘दबंग गर्ल’ बनून बॉलिवूडमध्ये दाखल झाल्यापासून तिच्या रूपाची तुलना जुन्या जमान्यातली अभिनेत्री रीना रॉयशी करण्यात येत आहे. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयचं त्या जमान्यात बहरलेल्या प्रेम प्रकरणाचं सोनाक्षी हे फळ असल्याचीही शक्यता बऱ्याच जणांनी वर्तवली. म्हणजेच सोनाक्षी ही रीना रॉयचीच मुलगी असावी, असा काहीजणांचा कयास आहे.

शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 11:40

बॉलिवूड अभिनेते, भाजपाचे माजी मंत्री आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे अंधेरीमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ६६ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांना दुपारच्या सुमारास श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.