नरेंद्र मोदी – ७ रेसकोर्स रोडसाठी रेस

नरेंद्र मोदी – ७ रेसकोर्स रोडसाठी रेस
२०१४ च्या लोकसभा निवडणुका या चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे.

एका चहावाल्याचा मुलगा आहे, अशी काहणी सांगून नरेंद्र मोदी या ६३ वर्षीय नेत्याने आपल्या पंतप्रधानपदाच्या रेसची सुरूवात केली. मोदी यांचे व्यक्तिमत्वाचे ध्रुवीकरण झाले असताना मोदी हे पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये सर्वात प्रबळ दावेदार दिसत आहे. त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा क्रमांक लागतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धावपट्टू म्हणून सुरूवात करणाऱ्या मोदी हे लंबी रेस का घोडा असल्याचे आपल्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांनी दाखवून दिले आहे. मोदी राष्ट्रीय राजकारणातील उदय हा त्यांच्या गुजरातचे विकासाचे मॉडेल, त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, गुप्त खासगी जीवन आणि वादग्रस्त भूतकाळ यानंतर झाला. या सर्व गोष्टीमुळे मोदी यांचा चाहता मोठा वर्गही निर्माण झाला आणि त्यांच्यावर टीका करणाराही मोठा वर्ग निर्माण झाला.

मोदी यांचे तंत्रज्ञानाला पसंती, आर्थिक धोरणं आणि व्हिजन यामुळे त्यांचे चहुबाजूने कौतुक झाले. तर गुजरातचा मनुष्यबळ विकास निर्देशांकांच्या आकडेवारी आणि गुजरात दंगलीवरून त्यांच्यावर टीकेची झोडही उठविण्यात आली. मोदी हे हुकूमशाह आहेत, ते कोणत्याही गोष्टीत तडजोड करत नाही आणि ते आक्रमक नेते असल्याचे त्याच्याकडे पाहिल्यावर समज होतो. पण त्याच्या नकटवर्तींयाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे व्यक्तिमत्व हे जादुई, प्रेमळ आणि प्रभावी आहेत. त्यांचा लोकांशी असलेला संपर्क विशेषतः तरुणांशी असलेला संपर्क हा खूप जबरदस्त आहे. मोदी हे अनेकांचे रोल मॉडेल आहेत.


मोदी हे त्यांचा बहारदार भाषण आणि जबरदस्त वकृत्त्व कौशल्यासाठी ओळखले जातात. स्वतःला कामात गढून घेणे आणि एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यांच्यावर नावावर नसणे ही त्यांची प्रतिष्ठा आहे. आपला संदेश किंवा आयडीया त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाटके करीत नाहीत. बॉलिवुड सुपरस्टार राजेश खन्नाप्रमाणे कुर्ता पायजमा आणि जॅकेट असा वेश परिधान करतात.

गुजरातमध्ये २०१२ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला. नमोची लाट त्यानंतर भारतीय राजकारणात खऱ्या रुपाने दिसून आली. नमोची ही लाट आता देशभरात पसरली आहे. सप्टेंबर २०११मध्ये मोदींनी सुरू केलेल्या सद्भावना मिशनद्वारे त्यांनी दिल्लीच्या दिशेने पाउल टाकले.

राजकारणात येण्यापूर्वी ते आपल्या किशोर वयात आरएसएस म्हणजे संघाचे सदस्य होते. ते आपल्या आयुष्यात एक योद्धा म्हणून कायम पुढे आले. सुरूवातीला शंकरसिंग वाघेला यांच्यासह त्यांनी काम केले. भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी खूपच मेहनत घेतली. भाजपने गुजरातमध्ये आपली पाळेमुळे जेव्हा रोवली. त्यावेळी मोदीही राजकीय नेते म्हणून पुढे आले आणि त्यांनी पक्षाचे सरचिटणीस झाले.

पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या एकनिष्ठ स्वयंसेवकाला निवडले. गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथील निवडणूक प्रचाराला दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. गुजरातमध्ये अडचणीत आलेल्या भाजप सरकारला तारण्यासाठी मोदी यांना केशुभाई पटेल यांच्या जागी ७ ऑक्टोबर २००१ मुख्यमंत्रिपद सोपविण्यात आले. याच ठिकाणी मोदी यांच्या हातात सुवर्णसंधी लागली. पोकळी भरून काढण्यासाठी मोदी यांना पुन्हा गुजरातमध्ये आणण्यात आले. मोदी यांना प्रशासकीय कामांचा काही अनुभव नसल्याने भाजप श्रेष्ठी सुरूवातीला त्यांना ही जबाबदारी देण्यात इच्छूक नव्हते. पण त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले, गुजरातची संपूर्ण जबाबदारी द्या किंवा मला काहीच नको. त्यानंतर मोदी यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी त्यानंतर आपल्या विरोधांना नेहमी गप्प केले. ते पक्षातील असो वा पक्षा बाहेरचे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक मैलाचे दगड पादाक्रांत केले.

२०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने १८२ पैकी ११५ जागांवर विजय मिळवला आणि मोदी सलग चौथ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांना भाजपच्या संसदीय मंडळावर सदस्य म्हणून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदीही विराजमान करण्यात आले.

मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भाजपला उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिसा, पंजाब, कर्नाटक या मोठ्या राज्यांमध्ये चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. तसेच भाजप प्रशासित राज्यात जसे मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान आणि पंजाब चांगल्या कामगिरीची पक्षाला अपेक्षा आहे. तसेच दिल्लीमधूनही त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दिल्ली विधानसभेत झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशात मुज्जफरनगर दंगलीमुळे मतदान विभाजनाची शक्यता अधिक आहे.

ईशान्यकडील राज्यात भाजपचे अस्तित्व नाही, या निवडणुकांच्या माध्यमातून खाते उघडण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजातील पावरफूल व्यक्तीमत्व येडीयुप्पा यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. तसेच बी. श्रीमालू या बीआरएसचे नेते जवळ आल्याने कर्नाटकमध्ये भाजपला चांगली संधी निर्माण झाली आहे.


बिहारमध्ये भाजपाशी काडीमोड केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडची प्रतिमा खराब झाली आहे. मोदींच्या सभेत झालेला हल्ला आणि राष्ट्रीय जनता दलातली बंडखोरीचे नाटक यामुळे येथील परिस्थीती चुरशीची झाली आहे. बिहारमधील ४० जागांवर निवडणूक लढविण्यासाठी भाजपने यापूर्वीचे मित्र असलेल्या नितीश कुमार यांना बाजुला केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने १२ वर्षांनंतर भाजपशी पुन्हा सूत जुळवलं आहे. मोदींच्या पंतप्रधानपदाला पासवान यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांची गोची झाली आहे.

ओडिशामध्ये बिजू जनता दलाशी असलेली जुनी मैत्री ही भाजपला पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणीही चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत मुख्य विरोधीपक्ष एनडीए दाखल झाल्यामुळे एआयएडीएमके आणि डीएमके यांच्यात तिरंगी होणार आहे.

आंध्रप्रदेशात काँग्रेसने तेलंगणा हे वेगळ राज्य केल्यामुळे पक्ष बँकफूटवर गेले आहे. त्यामुळे भाजपला सीमांध्र भागात काँग्रेस विरोधी लाटेचा फायदा होण्याची शक्यता आहे. टीडीपीने तिसऱ्या फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला जरा कठीण झाले आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी टीआरएस, वायएसआर काँग्रेस, भाजप आणि टीडीपी अशी बहुरंगी लढत होणार आहे.

महाराष्ट्रात मोदी यांची हवा आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना यांच्या २५ वर्षांच्या युतीत शेतकरी संघटना, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम असे सहा पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे या महायुतीमुळे भाजप मजबूत झाला आहे. पण दुसरीकडे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही ठिकाणी आपले उमेदवार उभे करून मित्रपक्ष शिवसेनला दणका देण्याचा प्रयत्न केला आहे. मास्टर स्ट्रोक असा की मनसेने उमेदवार निवडून आल्यास मोदींना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. राज्यात शरद पवार यांनी सावध पवित्रा घेत कधी मोदींवर टीका तर कधी स्तुती केली आहे. त्यामुळे येथील वातावरण खूप गोंधळाचे झाले आहे.

वरील सर्व वातावरणाचा आढावा घेतला तरी मतदानाच्या दिवशी काय होते आणि मतदार आपलं मत कोणाला देतात. यावरून मोदी ७ रेसकोर्सची रेस जिंकतील का हे १६ मे रोजी आपल्याला समजणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 11:39
First Published: Friday, April 4, 2014, 11:39
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?