www.24taas.com , सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा धुमशान होणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं या दोन पक्षातला संघर्ष पुन्हा झडणार आहे. राणेंच्या आजच्या सभेकडे लक्ष लागले आहे.
नगरपालिका निवडणुकीत सिंधुदुर्गवासियांना याची झलक पाहायला मिळाली होती. तर आता जिल्हा परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुडाळ इथं मागच्या आठवड्यात या धुमशानला सुरुवात केली. राणेंच्या बालेकिल्ल्यात थेट आव्हान दिलं होतं. कोण मुंबईतून येतो आणि इथे दादागिरी करतो. यापुढे ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता दिला होता. यावर राणे यांनी भाष्य केलं नव्हतं. मात्र, आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करू, असे थेट आव्हान दिलं आहे.
अजित पवारांनी डिवचल्यानं संतापलेले राणे कुडाळातच मंगळवारच्या सभेत प्रतिहल्ला करणार आहेत. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा अधिकार असल्याचं सांगत प्रतिआव्हान दिलय आहे. त्यामुळे राणे काय बोलतात याकडे लक्ष लागला आहे. दरम्यान, कोकणात दोन्ही काँग्रेस आमने-सामने असल्याने निवडणुकीकडेही लक्ष लागलं आहे.
First Published: Tuesday, January 31, 2012, 08:23