मनसेच्या नाराजांच्या हातात बंडाचा झेंडा

www.24taas.com,ठाणे
 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत ठाण्यामध्ये मनसेच्या नाराज कार्यकर्त्यांनी उद्रेक केला. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यासह राज्यातील इतर महापालिकांसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
 
 
यानंतर ठाणे महानगरपालिकेसाठी मनसेची उमेदवारी न मिळालेल्या नाराज कार्यकर्त्यांच्या बंडाचा झेंडा हाती घेतला आणि एकच धुडगुस घातला. नाराज इच्छुकांनी मनसेच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत यादी बदलणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
 
पक्षानं उमेदवारी दिलेल्या काही जणांच्या क्षमतेवर कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
 
कोपरी येथे अॅडव्होकेट समीर देशपांडे, नितीन भोईर, दत्तात्रय घाडगे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. तर कोपरी भागातील कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त असंतोष निर्माण झाला असून ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी १० लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप मनसेच्या ठाणे पूर्वचे अध्यक्ष रमाकांत कदम यांनी केला आहे.
 
मनसेला ठाणे पूर्व भागात फिरू देणार नाही आणि त्यांना मनसेचा प्रचार करू देणार नाही, असा इशाराही मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. मनसेचे नेते राजेश मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यालयासमोर गोंधळ घातला.
 

First Published: Sunday, January 29, 2012, 21:53
First Published: Sunday, January 29, 2012, 21:53
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?