www.24taas.com, मुंबईमुंबई मनपासाठी शिवसेनेची उमेदवारांची यादी जाहीर झाली नसली, तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना उमेदवारांनी सुरुवात केली आहे.
शाखाप्रमुखांमार्फत संबंधित वॉर्डातील उमेदवाराला ए, बी फॉर्मचं वाटपही झालं आहे. अनेक नगरसेवकांच्या पत्नीलाच उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक शशिकांत पाटकर यांची पत्नी शुभदा पाटकर यांना उमेदवारी मिळाली. तर मनोहर पांचाळ यांची पत्नी मनिषा पांचाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नगरसेवक शैलेश परब यांची पत्नी छाया परब यांना, तर संजय पोतनीस यांची पत्नी सुनयना पोतनीस तसचं माजी नगरसेवक सुभाषकांता सावंत यांची पत्नी छाया सावंत यांना नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळालीय. तर माजी नगरसेवक प्रदीप वेदक यांची पत्नी प्रणाली वेदक यांच्या पत्नीलाही उमेदवारी मिळाली आहे.
दरम्यान, मुंबईत शिवसेनेचे उमेदवार मिलिंद वैद्य यांच्याविरोधात गटप्रमुख अर्जुन नाईक यांनी बंड केलंय. अर्जुन नाईक मंगळवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. 'दादर माहिम मनसेला आंदण द्यायचा प्रयत्न' असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
First Published: Monday, January 30, 2012, 17:22