सेनेची महापौरांवर श्रद्धा, सातमकरांना सबुरीचा सल्ला!

मंगेश सातमकर करणार का बंड?


www.24taas.com, मुंबई
वडाळ्यात वॉर्ड 169 मधून अखेर महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळालीय. त्यामुळं इच्छुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर नाराज झालेत. त्यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय. खुल्या गटासाठी असलेल्या 169 वॉर्डमधून उमेदवारीसाठी श्रद्धा जाधव आणि नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यात चुरस होती अखेर त्यात महापौरांनी बाजी मारलीय.
 
 
सातमकर यांनी उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात दबावही आणला होता. सातमकर आतापर्यंत तीन वेळा निवडून आलेत. त्यांचा प्रतीक्षानगरमधला वॉर्ड 165 महिलांसाठी राखीव झाल्यानं सातमकर दुस-या वॉर्डच्या शोधात होते. सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघातला 169 हा एकमेव वॉर्ड खुला राहील्यानं त्यावर सातमकर यांनी दावा केला होता. मात्र पक्ष नेतृत्वानं श्रद्धा जाधव यांना संधी दिलीय.
 
 
उमेदवारी नाकारल्याने सातमकर नाराज झालेत. त्यांनी जाधव यांचा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलंय. बंड करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं सांगत त्यांनी संदीग्धता ठेवलीय. तसंच सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघातले अनेक पदाधिकारी सातमकर यांच्या समर्थनार्थ राजीनामा देणार असल्याचं सातमकर यांनी झी 24 तासशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितलं.
 

First Published: Monday, January 30, 2012, 20:42
First Published: Monday, January 30, 2012, 20:42
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?