ठाण्यात उमेदवारी नाही तर एबी फॉर्म सही

www.24taas.com, ठाणे
 
नाराज कार्यकर्ते काय करु शकतात याचा उत्तम नमुना ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच नाराज शिवसैनिक अंकुश पाटील या कार्यकर्त्याने चक्क स्नेहा देशमुख उमेदवाराचा एबी फॉर्मच पळून नेला.
 
स्नेहा देशमुख या फॉर्म भरायला जात असताना त्यांच्या हातातून तो अंकुश पाटीलने हिसकावून घेतला आणि धूम ठोकली. प्रत्येक निवडणुकीत बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजीचे अनेक प्रकार अनुभवयास मिळतात पण हा कळसाध्याय म्हणावा लागेल.

First Published: Tuesday, January 31, 2012, 16:00
First Published: Tuesday, January 31, 2012, 16:00
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?