प्रचाराआधी राज यांचं देवदर्शन!

www.24taas.com, पुणे
महापालिकेचा रणसंग्रामात होण्याआधी राज ठाकरेंनी मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेऊन श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेत भंडाराही उधळला.
 
राज ठाकरे यांच्या सोबत शिरीष पारकर, बाळा नांदगावकरस शिशिर शिंदे होते. कार्यक्रम खासगी असल्याचं सांगत राज यांनी पत्रकारांशी बोलायचं टाळलं.
 
विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत मिळालेली मते पाहता मनसेनं पुणे महापालिकेवर लक्ष केंद्रीत केलय. त्यामुळं राज यांनी खंडेराया आणि मोरेश्वरला काय साकडं घातलं हे सांगण्याची गरज नाही.

First Published: Wednesday, February 1, 2012, 20:43
First Published: Wednesday, February 1, 2012, 20:43
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?