बीड जिल्ह्यात भाजप उमेदवारावर हल्ला

www.24taas.com, बीड
 
भाजप उमेदवार दशरथ वनवेंवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला चढवल्याची घटना घडली. बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मानूर इथे पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला झाला. दशरथ वनवेंवर बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
बीड जिल्ह्याचे राजकारण गेल्या काही काळात ढवळून निघालं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे बंधु पंडित अण्णा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांनी त्यांना थेट आव्हान देत घणाघाती हल्ला चढवला होता. त्याआधी परळीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंडित अण्णांचे चिरंजीव आ.धनंजय मुंडेंनी बंडखोरी करत भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. तेंव्हापासून जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.
 
 
 

First Published: Monday, February 6, 2012, 14:13
First Published: Monday, February 6, 2012, 14:13
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?