विलासरांवाची नक्कल, मुंडें अडचणीत?

www.24taas.com, बीड
 
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी झेडपीच्या निवडणूक प्रचारात वीजचोरीचं समर्थन करणारं खळबळजनक विधान केलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांचे परम मित्र समजल्या जाणाऱ्या विलासरावांची नक्कल करत त्यांच्यावर टीकाही केली आहे.
 
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वीजचोरीवर खळबळजनक विधान केलं आहे. आपले सख्खे मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विलासराव देशमुखांवर टीका करता करता त्यांनी स्वत:लाच अडचणीत आणणारं विधान केलं आहे. आपण ऊर्जामंत्री असताना वीजचोरी करणाऱ्यांवर कधीच कारवाई केली नाही असं सांगत वीजचोरांची पाठऱाखण केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात रेणापूर प्रचार सभेत ते बोलत होते.
 
तर दुसरीकडे आपल्या मित्राची चक्क नक्कल करत त्यांनी विलासरावांच्या काळात मंत्री उजेडात राज्य अंधारात अशी स्थिती असल्याची टीका केली. लाईट दिली नाही, भाव दिला नाही तरी लोकं आम्हालाच मतं देतात असं विलासराव सांगत असतानाची नक्कल त्यांनी करून दाखवली.
 
 

First Published: Monday, February 6, 2012, 20:19
First Published: Monday, February 6, 2012, 20:19
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?