नितेश राणे कोंबडी, तर आदित्य ठाकरे मिकीमाऊस!

ठाकरे-राणे घराण्यातील दुसऱ्या पिढीत वाकयुद्ध


www.24taas.com,मुंबई
ठाकरे-राणे परिवाराच्या दुसऱ्या पिढीत आता चांगलीच जुंपली आहे. आदित्य ठाकरे यांनी नितेश राणेंना कोंबडी म्हटले तर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सेनेचा मिकीमाऊस म्हणून जोरदार पलटवार केला आहे.
 
नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेवर शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कोंबडी पळाली, या शब्दांत संभावना केलीय. तर आदित्य ठाकरे यांनी अंड्यातून बाहेर यावं, दाढी करायला शिकावं, आदित्य ठाकरे हे सेनेचे मिकीमाऊस आहेत, अशा शब्दांत नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.
 
मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराची पोलखोल करण्यासाठी शिवसेनाभवनासमोर स्वाभिमान संघटनेनं पथनाट्याचं आयोजन केलं होतं. मात्र याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच त्यांनी सेनाभवनासमोर गर्दी करण्यास सुरुवात केली. दोन्ही पक्षांमध्ये होणारा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी या पथनाट्याला परवानगी नाकारली. त्यामुळे स्वाभिमानचे हे पथनाट्य सादर होऊ शकलं नाही.
 
दुपारच्या सुमारास माहिमपासून सुरु होणारा रोड शो आदित्य यांनी सेनाभवनापासून सुरु केला. यावेळी बोलताना आदित्य यांनी नितेश राणें यांना कोंबडी पळाली म्हणून टोला लगावला.
 
त्यानंतर, नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आदित्य ठाकरे यांनी सुरूवातीला अंड्यातून बाहेर यावं, दाढी करायला शिकावं. आदित्य हे सेनेचे मिकीमाऊस आहेत, त्यांनी मोठं व्हावं, मग टीका करावी, कोंबडीची भाषा करावी, अशा शब्दांत जोरदार पलटवार केला आहे.

First Published: Friday, February 10, 2012, 20:20
First Published: Friday, February 10, 2012, 20:20
TAGS:
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?