पवारांना कोंबडी, तंगड्यांशिवाय काही दिसत नाही - उद्धव

www.24taas.com, नाशिक
 
शरद पवारांना आजकाल कोंबडी आणि तंगड्यांशिवाय काही दिसत नाही असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला. सोनेरी कोंबडी कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढा याला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला. पवननगर परिसरातील पहिल्याच सभेत शिवसेनेची तोफ धडाडत भुजबळांच्या एमईटीच्या गैरव्यवहारावरही नाशिककरांसमोर मांडले.
 
मुंबईकरांच्या पाण्याची समस्या सोडवू शकला नाहीतर काय करुन दाखवलं असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला लगावलाय. गोवंडीमध्ये आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत त्यांनी शिवसेना-भाजप युतीच्या कारभारावर सडकून टीका केली.
 
अजित पवार हे चंबळचे दरोडेखोर आहेत, अशी बोचरी टीका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. अजित पवारांनी सहकारी बँका बुडवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. नागपुरात भाजपच्या सभेत त्यांनी हा हल्लाबोल केला.

First Published: Saturday, February 11, 2012, 11:56
First Published: Saturday, February 11, 2012, 11:56
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?