www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरात आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी रोड शोद्वारे प्रचार केला. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे बंद काचांमधून नाशिक रोड, जेल रोड, इंदिरानगर, सिडको परिसरात रोड शो केला. तर आदित्य ठाकरेंनी ओपन जीपमधून शहरात प्रचार केला.
काका पुतण्यांच्या या रॅलीनं नाशिकमध्ये प्रचाराची रणधुमाळी जाणवत होती. अधिका-यांच्या बदलीमुळे नाशिकची निवडणूक संशयास्पद ठरत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलीय. निवडणूक पारदर्शी होण्यासाठी आयोगानं योग्य ते पाऊल उचलण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
First Published: Sunday, February 12, 2012, 19:10