www.24taas.com, मुंबई महानगरपालिकेचा प्रचार करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असल्याने मुंबईत आज प्रचारसभांना उधाण आलं होतं. पण अवघ्या महाराष्ट्रासह मुंबईचं लक्ष लागलं होतं ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेकडे. बाळासाहेबांच्या आजच्या मुंबईतील सभेसाठी तुफान गर्दी झाली होती. १६ फेब्रुवारीला मतदान करा आणि त्याचसोबत काँग्रेसला गाडा असं आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईकरांना केलं आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पण त्याच बरोबर बाळासाहेूबांनी त्यांच्या घराणेशाही विषय पुन्हा एकदा मांडला. पुन्हा पुन्हा बाळासाहेबांना त्यांच्या घराणेशाहीवर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. बाळासाहेबांची पुन्हा एकदा भुजबळांवर टीकाबाळासाहेबांनी भाषणाला सुरवात करताच आज आपल्या ठाकरी शैलीत सर्वप्रथम शरसंधान साधलं ते छगन भुजबळ यांच्यावर. 'नाशिकमध्ये लखोबाने किणी प्रकरण बाहेर काढलं आहे', 'लखोबाला म्हटलं की तेलगी प्रकरणात कुठे कुठे तेल लावलं ते ठाऊक आहे ना',? असं म्हणतं राज ठाकरे यांच्यावर भुजबळांनी केलेल्या टीकेला बाळासाहेबांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. खुमासदार शैलीतले 'बाळासाहेब'बाळासाहेब आज यांनी अगदी खुमासदार शैलीत आठवले यांच्या भाषणांची थोडी नक्कल करतं त्यांना देखील थोड्याफार कानपिचक्या दिल्या. 'आठवले आपल्याजवळ आले आहेत, आणि राहणार आहेत', असं म्हणतं त्यांनी नामांतराचा विषय देखील काढला. 'आंबेडकरांचे पुतळे उभारण्यापेक्षा रमाबाई नगरमधल्या झोपडपट्यांच्या जागी टॉवर उभे राहू दे', 'डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिलं आहे'. असं म्हणतं बाळासाहेब यांनी नामांतराचा विषय देखील चांगलाच हाताळला. घराणेशाहीत अडकले पुन्हा बाळासाहेबबाळासाहेब यांना घराणेशाहीबाबत पुन्हा एकदा आज स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे त्यांना वारंवार या घराणेशाहीवर भाष्य करावे लागत आहे. 'मी सत्तेच्या खुर्चीवर बसलो नाही, बसणार नाही', असं म्हणतं बाळासाहेबांनी मात्र घराणेशाही शिवशाहीत चालत नाही असे सांगून, पुन्हा एकदा घराणेशाहीचा इतिहास त्यांनी सांगितला. 'उद्धव मी तुमच्यावर लादलेला नाही, राजनेचं ठराव मांडला होता', 'मी घराणेशाही लादली नाही, मी नेता नेमला नाही', 'काँग्रेसने आता जे सुरू केलेयं ना ती घराणेशाही आहे', असं म्हणून पुन्हा एकदा बाळासाहेबांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीकास्त्र सोडलं. बाळासाहेबांची त्यांच्या भाषणातील टोलेबाजी - लोकशाहीला काही अर्थ राहीला नाही.
- उद्धव ठाकरेंच्या करून दाखवले टीका
- १६ फेब्रुवारीला काँग्रेसला गाडा
- चव्हाण आहात का चोपडे, काय ऐतिहासिक नाव आहे.
- बाळासाहेबांनी उडवली रामदास आठवलेंची टर
- जुनं का उकरून काढताहेत
- शरद पवारांनी शिवसेनेची पहिली सभाला कट्ट्यावर बसून पाहिली होती.
- घरात नाही पीठ आणि कशाला हवे विद्यापीठ
- डॉ. बाळासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले आहे.
- शरदबाबू सत्य का सांगत नाही. पीठाचं काय घेऊन बसलाहेत.
- काँग्रेसला नेतृत्त्व नाही,
- एक परदेशी बाई येते आणि हुकूमत गाजवते आहे.
- महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी उद्धव यांना कार्याध्यक्ष केलं.
- मी सत्तेच्या खुर्चीवर बसलो नाही, बसणार नाही – बाळासाहेब
- आदित्य ठाकरेलाही लादले नाही.
- लुंगीवाले, सलामी घेत आहे. शत्रु लपायला आले तर कुठे लपतील.
- मोबाईल आणि पैसे देऊन राष्ट्रवादीने निवडणुका जिंकल्या.
- १९६६ मध्ये बोललो होतो. मुंबईत परमिट सिस्टिम हवी.
- बांगलादेशचे इथे, येताहेत आणि कुठे घुसले आहेत.
- लष्करप्रमुखांचा वाद कोर्टात आपल्याला लाज वाटली पाहिजे.
- अजूनही १८ वर्तमानपत्र वाचतो.
- तुम्ही माझं टॉनिक आहे.
- आंबेडकरांचे पुतळे उभारण्यापेक्षा रमाबाई आंबेडकर नगरात गरिबांचे टॉवर उभे राहू द्या.
First Published: Tuesday, February 14, 2012, 00:10