सेना-मनसे कार्यकर्ते आमने-सामने

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत शिवसेना आणि महाराषट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते  आमने-सामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाल्याने राडा होण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले.
 
 
दादरमधल्या गोखले रोडवर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. यापैकी कोणीही मागे हटण्यास तयार नसल्यानं आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करुन कार्यकर्त्यांना पांगवले. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाला असता तर याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
 
 
शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक १८४ चे उमेदवार यशवंत विचले आणि मनसेचे १८५ वॉर्डचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय.
 

 

First Published: Tuesday, February 14, 2012, 20:34
First Published: Tuesday, February 14, 2012, 20:34
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?