... अन् बाळासाहेब गहिवरले

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महापालिकेवर सलग चौथ्यांदा भगवा फडकावल्याने आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची योग्य प्रकारे जबाबदारी संभाळली. आणि त्याचं फळ हे त्यांना निश्चितच मिळालं.
 
मुंबईकर आणि ठाणेकरांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे भारावलेल्या शिवसेनाप्रमुखांनी तमाम मतदारांचे आभार मानले आहेत. लाखो लाखो नव्हे, तर अब्जो अब्जो आभार या शब्दात त्यांनी हा आनंद व्यक्त केला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही, हेच या निकालानं दाखवून दिल्याचंही बाळासाहेबांनी म्हंटलं आहे.
 
"माझ्याकडे आज शब्द नाहीत. आतापर्यंत मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो होतो. आज अब्जो अब्जो धन्यवाद देतो." अशी भावनिक प्रतिक्रिया बाळासाहेबांनी व्यक्त केली. "तसचं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही हे आज मतदारांनी दाखवून दिलं." आज पहिल्यांदाच बाळासाहेब इतके भावनाशील झालेले दिसून आले.
 
 
 

First Published: Friday, February 17, 2012, 23:17
First Published: Friday, February 17, 2012, 23:17
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?