मुंबईच्या महापौर शर्यतीत सुनील प्रभू

www.24taas.com,  मुंबई
 
 
मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे १०६ नगरसेवक निवडून आल्यान महायुतीचाच महापौर होणार, हे स्पष्ट आहे. या महापौर पदाच्या शर्यतीत चार टर्म निवडून आलेले सुनील प्रभू अग्रस्थानी आहेत. तर स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल शेवाळे विराजमान होण्याची शक्यता आहे.
 
 
मुंबई महापालिकेत सतरा वर्षाची सत्ता अबाधित राखत शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे १०६ नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीच्या या नगरसेवकात शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आल्यान शिवसेनेचा महापौर  होणार आहे. महापौर पदाच्या शर्यतीत चार टर्म निवडून आलेले सुनील प्रभू अग्रस्थानी आहेत. तर स्थायी समिती पदी पुन्हा एकदा राहुल शेवाळे विराजमान होणार आहेत.
 
 
महापौर श्रध्दा जाधव आणि माजी महापौर शुभा राऊळ पालिका सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत आहेत. महापौर पदाच्या स्पर्धेबद्दल सुनील प्रभूना विचारले असता,  त्यांचं असं उत्तर आहे. महायुतीत महापौर पदाची रस्सीखेच सुरू असताना. भाजपमधून कॉग्रेसमध्ये आलेले आणि तीन टर्म पूर्ण झालेले प्रवीण छेडा याच नाव विरोधी पक्षनेते पदासाठी अग्रस्थानी आहे. मात्र प्रवीण छेडा यांना कॉग्रसेमधील निष्ठावान सहाकार्य करतील का हाच खरा सवाल आहे.
 

First Published: Thursday, February 23, 2012, 22:47
First Published: Thursday, February 23, 2012, 22:47
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?