www.24taas.com, मुंबई
महापालिका निवडणुकीत दादर-माहिममध्ये शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर तिथली जबाबदारी असलेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी उद्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत शिवसेनेच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यात येणार आहे. मनसेनं या भागातल्या सर्व जागा जिंकल्यानं हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे जोशींची राजकीय कारकिर्दही संकटात आलीय.
जोशींची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आली असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची चिन्हंही धूसर झाली. रिपाइं नेते रामदास आठवलेंना शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता असून दादरमधल्या पराभवानं जोशींचा पत्ता कट होणार हे जवळजवळ निश्चित झालंय.
First Published: Tuesday, February 21, 2012, 21:04