www.24taas.com, मुंबईनाशिक महापालिकेच्या सत्तासमीकरणांत नवे रंग भरलेत. भुजबळांनी आठवलेंना महापौरपदाची ऑफर दिली. शिवसेना-भाजप युतीचा पाठिंबा मिळाला तर तीन पक्षांच्या पाठिंब्यानं नाशिकमध्ये आठवलेंचा महापौर होऊ शकतो. त्यामुळे आता ४० जागा मिळवून नाशिक महापालिकेत मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या मनसेला या खेळीने धक्का बसू शकतो.
नाशिकचा महापौर मनसेचाच होईल या राज ठाकरेंच्या घोषणेनंतर छगन भुजबळ यांनीही सत्ता स्थापनेचे संकेत दिले होते. सत्ता स्थापनेच्या या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळं नाशिकमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती.
त्यातच बुधवारी संध्याकाळी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानं नवी समिकरणं उदयाला येण्याची चिन्ह निर्माण झालीएत. भुजबळांनी आठवलेंना महापौर पदाची ऑफर दिलीय.
First Published: Wednesday, February 22, 2012, 22:06