बिळात घुसण्याचा प्रयत्न करू नका - बाळासाहेब

www.24taas.com, मुंबई
 
नाशिकमध्ये मनसे सत्तेसाठी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. मात्र काल भाजप नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेूबांची भेट घेतली. तेव्हा बाळासाहेब यांनी त्यांच्या नेहमीच्या ठाकरी शैलीत भाजप नेत्यांना परखड शब्दात सुनावले. 'नाशिकमध्ये भलत्यासलत्या बिळात घुसण्याचा प्रयत्न करु नका', अशा शब्दांत बाळासाहेबांनी भाजपला फटकारलं आहे.
 
नाशिकमध्ये मनसेचा महापौर होण्यासाठी भाजप नेत्यांची मनसेशी वाढती जवळीक होत असल्याच्या पार्श्र्वभूमिवर बाळासाहेबांनी भाजप नेत्यांना ठणकावलं आहे. नाशकात मनसे महापौर निवडीचा प्रस्ताव धुडकावला आहे. युतीत विसंवाद असल्याचं चित्र असताना भाजप नेत्यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी भाजपच्या वाढत्या आक्रमकतेला लगाम घालण्याचा प्रयत्न केला.
 
जेथे शिवसेनेची संख्या जास्त तेथे भाजपनं संपूर्ण पाठिंबा द्यावा, जेथे भाजपची संख्या कमी तेथे शिवसेनेने संपूर्ण पाठिंबा द्यावा आणि आरपीआयशी चर्चा करुन एकत्रितपणे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष अथवा पंचायत समिती सभापतींच्या सत्तस्थापनेचा निर्णय घ्यावा, असं शिवसेनाप्रमुखांनी ठणकावलं आहे.
 
 

First Published: Sunday, February 26, 2012, 11:50
First Published: Sunday, February 26, 2012, 11:50
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?