मुंबईत भाजपला महापौरपद हवेच - तावडे

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. मुंबईतल्या महापौरपदावर भाजपनं दावा केला आहे. एक टर्म तरी महापौरपद हवेच अशी आग्रही मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तर पदासाठी कोणीही भांडू नये या शब्दात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी तावडेंना कानपिचक्या दिल्या.
 
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर आता शिवसेना-भाजपमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. २००७च्या तुलनेत शिवसेनेची मतं कमी झाली आणि भाजपची मतं वाढली, असा हिशेब मांडत भाजपनं थेट महापौरपदावरच दावा सांगितला आहे. १० टक्के मतं वाढवण्याचं टार्गेट असताना तब्बल १८ टक्के मतं वाढवली, असं सांगत एक टर्म तरी महापौरपद हवंच, अशी आग्रही मागणी विनोद तावडेंनी केली आहे.
 
तावडेंच्या या मागणीनंतर गरम होऊ पाहणारं वातावरण थंड करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केला आहे. पदासाठी आग्रह न धरता, तीन पक्षांनी एकत्र येऊन काम कऱण्याचा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला आहे. निवडणुका होईपर्यंत कुठलेही वाद होऊ न देण्याची काळजी महायुतीनं घेतली होती. मात्र निवडणुकीत मिळालेल्या यशामुळं आता भाजपला महापौरपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. आता भाजपचं हे स्वप्न साकार होतं का, हे कळायला फार काळ राहिलेला नाही.
 
 
 

First Published: Tuesday, February 28, 2012, 08:11
First Published: Tuesday, February 28, 2012, 08:11
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?