पालकमंत्री नाईकांसोबत फिरतोय फरार गुंड?

www.24taas.com, नवी मुंबई
ठाण्यातला फरार गुंड आणि काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक राजा गवारी आज नवी मुंबईतल्या कोकण भवनात चक्क पालकमंत्री गणेश नाईक आणि खासदार संजीव नाईक यांच्यासोबत दिसला. पोलिसांना चकवा देणा-या गवारीचं दर्शन आज चक्क पालकमंत्र्यांसोबत झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.
 
ठाण्यातील विटावा या ५३ क्रमांकाच्या वॉर्डातून निवडून आलेला फरारी गुंड राजा गवारी याला हा हत्येचा आरोपाखाली फरार आहे. त्याने निवडणुकीचा प्रचारही केला नाही. परंतु तो निवडून आला. अनेक दिवसांपासून तो गायब होता. आज त्याने नगरसेवक म्हणून नोंद करू घेतली, असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी त्याच्यासह काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. त्यात प्रामुख्याने संजीव नाईक यांचा समावेश होता, असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.
 
तसेच गवारी याची नगरसेवक नोंदणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या छत्र छायेखाली झाली असल्याचा आरोपही सेनेकडून केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आमदार संदीप नाईक आणि भरत नखाते हे देखील यावेळी उपस्थित होते. गवारी याच्याविरुद्ध ३०२ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असताना सुरक्षेत त्याला कोकण भवनात नगरसेवक नोंदणीसाठी राष्ट्रवादीने नेल्याचा आरोपही सेनेतर्फे करण्यात येत आहे.
 
दरम्यान, खासदार संजीव नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सेनेकडे कॅमेरा असेल तर त्यांनी दाखवावा. मी सध्या मुंबईत एका बैठकीत आहे. तसेच पालकमंत्री गणेश नाईक हे सध्या जनता दरबारात आहेत. त्यामुळे राजा गवारीसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. विनाकारण चुकीचे आरोप होत, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

First Published: Thursday, March 1, 2012, 21:13
First Published: Thursday, March 1, 2012, 21:13
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?