ठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच!

www.24taas.com, ठाणे
 
अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने मनसेच्या सात नगरसेवकांनी युतीच्या बाजुने मतदान केलं तर सेना-भाजपकडे ६६ इतकं संख्याबळ आधीपासून होतं. नजीब मुल्ला यांना ५४ मते पडली.
 
हरिश्चंद्र पाटील २००२ सालापासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे असलेल्या पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि अचूक राजकीय खेळी खेळत ते महापौरपदावरही आरुढ झाले आहेत. सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर हरिश्चंद्र पाटील यांच्यासाठी शब्द टाकला होता. ठाण्यात विद्यमान महापौर अशोक वैती आणि राजेंद्र साप्ते हे महापौरपदाच्या शर्यतीत होते. पण एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर आपल्या शब्दाला किंमत आहे हे दाखवून देत आपले समर्थक असलेल्या पाटील यांची वर्णी महापौरपदावर लावली.
 
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका ताब्यात घेण्यासाठी केलेला आटापिटा व्यर्थ ठरला आहे. नगरसेविका अनिता केणी आणि शकिला कुरेशी अनुपस्थिती राहल्या. या दोघीही काँग्रेस नगरसेविका आहेत. त्याही गेल्या दोन दिवस गायब होत्या. महापौरपदाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या नावाला या दोघींचाही विरोध होता.  बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचे मतही युतीच्या पारड्यात पडलं.
 
शिवसेना कार्यकर्ते-पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. महापालिकेत महापौर निवडणूकीसाठी आत जाण्यास कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केल्याने ही बाचाबाची झाली. ठाणे महापालिकेला अक्षरश: छावणीचे स्वरुप आलं आहे. ठाणे महापालिकेबाहेर पोलिस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाली. महापालिकेबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना-भाजपला जाहीर पाठिंबा दिल्याने सेनेचा महापौर होणार हे निश्चित आहे.
बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडेही सभागृहात अवतरल्या आहेत. लोखंडे बेपत्ता झाल्याने गेले तीन दिवस ठाण्यात रणकंदन माजलं होतं. शिवसेना-भाजपने ठाणे बंदचे आवाहन केलं होतं तसंच महामोर्चाही काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरुन महामोर्चाला परवानगी नाकारली. तसचं भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी लोखंडेंच्या अपहरणासंदर्भात उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस रिट दाखल केलं. सेना-भाजपच्या ठाणे बंदला हिंसक वळण लागलं आणि शिवसैनिकांनी अनेक बसेसची तोडफोड केली.   ठाणे महापालिकेबाहेर पोलिस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाली. महापालिकेबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
 
 

First Published: Wednesday, March 7, 2012, 08:28
First Published: Wednesday, March 7, 2012, 08:28
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?