मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला मोफत सल्ले

मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला मोफत सल्ले
www.24taas.com,झी मीडिया

आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेला दगा देऊन भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी छुपी युती केल्याचा खरमरीत आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. भाजपच्या या छुप्या कारस्थानात शिवसेनेच्या जागा पाडण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी महायुती संदर्भात दर्शवली.

लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात मनसे सोबत नवीनच छुपी युती केली आहे. त्यामुळेच शिवसेना-भाजप युतीला यामुळे तडा जाऊन, २० वर्षांहून जास्त काळ अस्तित्वात असलेल्या युतीवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. मनसेच्या सोबत राहून शिवसेनेच्या जागा पाडण्याचे या छुप्या युतीने ठरविले आहे.

शिवसेनेच्या विरोधात मनसेचा उमेदवार लढणार. पण भाजपच्या विरोधात लढणार नाही. म्हणुन भाजपच्या जागेवर शिवसेनेचे कार्यकर्ते कोणाचे काम करणार? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसेच भाजप सरळ शिवसेनेच्या जागा पाडणार असेल तर शिवसेनेने आणखी किती दिवस अपमानित व्हायचे ते ठरवले पाहिजे. असा सल्ला ही पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेनेला दिला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 12:39
First Published: Wednesday, April 9, 2014, 12:39
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?