www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीकाँग्रेसने आपली ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने युवा उमेदवारांना जास्त तिकीट दिली आहेत.
यूथ काँग्रेसच्या नऊ पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. राजीव सातव यांना हिंगोलीत उमेदवारी देण्यात आली आहे.
मेरठमधून अभिनेत्री नगमाला तिकीट देण्यात आलंय, तर माजी कर्णधार अझरूद्दीनला उमेदवारांच्या यादीतून क्लीन बोल्ड करण्यात आलंय.
अझहरूद्दीनला लोकसभेसाठी आणखी कुठून निवडणुकीच्या पिचवर बॅटिंग करायला उतरवण्यात येईल किंवा नाही, ते स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
काँग्रेसने ७१ उमेदवारांच्या यादीत १० महिला उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत समावेश आहे.
अभिनेता राज बब्बरला गाझियाबादमधून, तर पवन बन्सल यांना चंदिगडमधून तिकीट देण्यात आलं आहे. सध्या गाझियाबादमधून राजनाथ सिंह खासदार आहेत.
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना केरळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 13, 2014, 20:46