www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरीरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा पार्ट टू रंगू लागलाय. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत दहावी नापास असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते नारायण राणे कुटुंबीयांना राऊत यांनी थेट एमएची पदवी दाखवत चोख उत्तर दिलंय. सध्या तरी कोकणातलं राजकारण विकासाचे मुद्दे सोडून नको तिकडे भरकटलंय.
रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्याऐवजी आता उमेदवाऱ्याच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा रंगतोय. राणे कुटुबीयांनी महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे दहावी नापास असल्याचा प्रचाराचा मुद्दा केला होता. मात्र हा मुद्दा खोडून काढत राऊत यांनी एमए पार्ट वन चे सर्टिफिकेट दाखवत राणे यांना उत्तर दिलं. डाँक्टर महाशयांनी आपण चुकीचे बोललो हे मान्य करावे. कोकणी जनतेची माफी मागावी असं आवाहनत राऊत यांनी केलंय.
राऊत केवळ एमए पार्ट वन झाल्याचं सांगताना राऊत दहावी पास नाहीत हा आपलाच मुद्दा नितेश राणेंनी खोडलाय. कोकणात उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या नाट्याचा पार्ट टू रंगतोय.
उमेदवारांच्या या शैक्षणिक पात्रतेच्या नाट्यात कोकणातील विकासाचे मुद्दे मागे पडत आहेत. नीलेश राणे यांच्या डॉक्टरेटचा तपशील जनतेसमोर ठेवत राणे कुटुंबीय या शैक्षणिक पात्रता नाट्याचा शेवट करणार का हे पाहणे आता औत्सुक्याच ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, March 29, 2014, 12:34