पावळेचा पाणी पाष्टाक !

Last Updated: Saturday, May 17, 2014, 11:35

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !

राणे-राऊत कलगितूरा, कोकण विकास मुद्दा बाजुला

Last Updated: Saturday, March 29, 2014, 12:38

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा पार्ट टू रंगू लागलाय. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत दहावी नापास असल्याचा आरोप करणाऱ्या राणे कुटुंबाला राऊत यांनी थेट एमएची पदवी दाखवत चोख उत्तर दिलंय. सध्या तरी कोकणातलं राजकारण विकासाचे मुद्दे सोडून नको तिकडे भरकटलंय.

राऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 09:25

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

नारायण राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका

Last Updated: Friday, November 22, 2013, 17:44

काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज रत्नागिरीत बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करू, असे जाहीर आव्हान राणे यांनी दिले.