देशात स्थिर सरकार आशेने शेअर बाजारात उत्साह

देशात स्थिर सरकार आशेने शेअर बाजारात उत्साह
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर देशात स्थिर सरकार येईल या आशेनं शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय. सलग तिस-या दिवशी सेन्सेक्स वधारल्याचं दिसतंय.

आज सकाळी बाजार उघडताच 370 अंशांनी वधारुन 23921 उघडला. तर निफ्टीही 7116 अंशांवर पोहोचलाय. शेअर बाजार आणि सट्टाबाजार गरम असतानाच भाजपच्या गोटातही आशादायी चित्र आहे.

जागोजागी भाजप कार्यकर्ते विजयोत्सवाच्या जोरदार तयारीला लागलेत. ढोल-ताशे आणि मिठाईच्या ऑर्डर्स भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दिल्या आहेत. गिरगावमध्ये हजार किलो मिठाईची ऑर्डर भाजप कार्यकर्त्यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे शेअर बाजाराबरोबरच सट्टा बाजारालाही एनडीएचंच सरकार येईल, असं वाटतंय. भाजपप्रणित एनडीएला लोकसभा निवडणुकीत 310 जागा मिळतील, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 10:49
First Published: Tuesday, May 13, 2014, 11:08
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?