शेअर बाजाराच्या घडामोडींवर नजर - रघुराम राजन

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 08:16

शेअर बाजारातल्या मोठ्या चढ-उतारांवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून असल्याचं बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केलंय. काल त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. अर्थमंत्र्यांनी शेअर बाजारातल्या घडामोडींबाबत सावध केलंय.

देशात स्थिर सरकार आशेने शेअर बाजारात उत्साह

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 11:08

सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर देशात स्थिर सरकार येईल या आशेनं शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय. सलग तिस-या दिवशी सेन्सेक्स वधारल्याचं दिसतंय.

दोन वर्षात पहिल्यांदाच – सेन्सेक्स २०,००० पेक्षा जास्त अंकांवर बंद

Last Updated: Friday, January 18, 2013, 18:17

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी दोन वर्षानंतर पहिल्यांदाच २०,००० अंकांपेक्षा जास्त स्तरावर बंद झाला. डीझेल किंमतींना नियंत्रणमुक्त केल्यामुळे रिफाइनरी कंपन्यांच्या शेअर्सची आज बाजारात चलती राहिली. याशिवाय कंपन्यांच्या अंकांमध्येही सुधारणा जाणवली.

शेअर बाजारात तेजी

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 12:23

गेले काही महिने मंदीच्या सावटाखाली असणारा शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने २०,००० हजारापर्यंत उसळी मारली. दरम्यान, आज १९,९६५.४६ वर मार्केट खुले झाले.

पाहा आजचा शेअर बाजार

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 10:40

आज शेअर बाजार खुला होतानाचं . मुंबई शेअरबाजार १७ हजार २०८ सेन्सेक्सवर खुला झाला त्यात ७ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार २३५ अंशांवर खुला झाला.

शेअरबाजारातील घडामोडी

Last Updated: Thursday, March 29, 2012, 10:45

मुंबई शेअरबाजार १७ हजार १६ पूर्णांक २० सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार ५ हजार १४९ पूर्णांक ५० निफ्टी निर्देशकांवर खुला झाला.