नवाज शरीफांच्या मुलीनं मानले मोदींचे आभार

नवाज शरीफांच्या मुलीनं मानले मोदींचे आभार
www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियमनं बुधवारी सकाळी ट्वीट करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

नवाझ शरीफ, नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात सहभागी होवून पाकिस्तानात परतले आहेत. पण ते रिकाम्या हातांनी नाही तर नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफांच्या आईसाठी दिलेली शॉल घेवून. याच भेटवस्तूचे आभार मानण्यासाठी मरियमनं ट्वीट केलंय.

तिनं लिहिलंय की, “माझे वडील स्वत: ही सुंदर भेटवस्तू आजीला देतील”. मरियमनं शॉलचा फोटो सुद्धा ट्विटरवर टाकलाय.

शपथविधी समारंभासाठी आलेले नवाज शरीफ काल संध्याकाळी पाकिस्तानात परतले. या यात्रेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबतच अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. मोदींसोबतच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या आईची चौकशी केली.





* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 28, 2014, 14:18
First Published: Thursday, May 29, 2014, 09:47
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?