दिग्गजांच्या या 14 जागांची प्रतिष्ठा पणाला...

दिग्गजांच्या या 14 जागांची प्रतिष्ठा पणाला...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील महत्वाच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. देशात एकूण 14 ठिकाणी लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान खासदारांनी आपण विजय होणार, असा दावा केला असला तरी अनेक लढती लक्षवेधक होणार आहेत. येथे काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

पाटलीपुत्र
2009पासून जनता दल (यु)चे के.पी. रंजन प्रसाद यादव यांच्याकडे ही जागा आहे. त्यांनी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पराभवाचा धक्का दिला. 23 हजार मतांनी लालूंवर त्यांनी मात केली. यावेळी के.पी. यादवच नशिब अजमावत आहेत. तर लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा यादव रिंगणात आहे. तर भाजपने मीसाचे काका रामकृपाल यादव यांना निवडणूक आखाड्यात उतरविले आहे. या मतदार संघात रामकृपाल यादव आणि लालूंची मुलगी मीसा भारती यांच्याकडेच जास्त लक्ष लागले आहे.

पटना साहिब
या ठिकाणाहून अभिनेता आणि भाजप नेता शत्रुघ्न सिन्हा याने राजदचे विजय कुमार यांना हरवून पक्कड मजबूत केली. त्यांच्यावर पुन्हा भाजपने विश्वास दाखवला आहे. तर काँग्रेसने भोजपूरी अभिनेता कुणाल सिंग याला उतरविले आहे. तर आपने परवीन अमानुल्लाह, बसपाने गणेश सॉ, जद (यु)ने डॉ. गोपाल प्रसाद सिन्हा आणि सपाने उमेश कुमार यांना रिंगणात उतरविले आहे. येथे सरळ लढत ही भाजप-काँग्रेसमध्ये असेल.

महासमुंद
काँग्रेस उमेदवार आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. 2004मध्ये जोगी यांनी विजय संपादन केला. तर 2009मध्ये या जागेवर भाजपचे चंदू लाल साहू ने बाजी मारली. आता या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे. या ठिकाणी 11 चंदू साहू निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

दक्षिण बंगुळरु
काँग्रेसचे नवोदीत नंदन नीलेकणी आणि भाजपचे दिग्गज अनंत कुमार यांच्यात जोरदार टक्कर आहे. नंदन नीलेकणी इन्फोसिस क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यामुळे याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तर आधार कार्डमुळे त्यांचे नाव सर्वांपर्यंत पोहोचले आहे. 1996मध्ये ही जागा अनंत कुमार यांनी जिंकली होती. तर आपकडून नीना पी नायक, बसपा, जद (यु), जनता दल यांचेही उमेदवार आहेत. खरी टक्कर काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे.

ग्वॉलियर
भाजपचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र तोमर या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसकडून अशोक सिंग मैदानात आहेत. आपने नीलम अग्रवाल यांना उमेदवारी देऊन येथे रंगत वाढविली आहे. 2009मध्ये भाजपचे यशोधरा राज यांनी अशोक सिंग यांन हरविले होते. या ठिकाणी काँग्रेस दोन वेळा पराजीत झाली.

गुना
भाजपची राजमाता सिंधिया यांनी 1998मध्ये या ठिकाणाहून बाजी मारली. 1999नंतर ही जागा काँग्रेसचे माधवराव सिंधिया यांच्या अधिकारात आली. 2002, 2004 आणि 2009या निवडणुीकत काँग्रेसकडून ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूय येत आहेत. यावेळीही ज्योतिरादित्य यांनाच संधी देण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याविरोधात भाजपचे जयभान सिंग पवॅया आहेत. या ठिकाणी काँग्रेसचा विजय होत आला आहे. तरीही यावेळी मोदींची लाट असल्याने लक्ष लागले आहे.

बारामती
महाराष्ट्रातील या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अनेक वर्ष राज्य केले आहे. तेच सलग निवडणून आले आहे. याआधीच्या (2009) निवडणुकीत पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे निवडून आल्यात. यावेळीही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महायुतीच्या पाठिंब्याने भाजपने महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. तसेच आपचे सुरेश खोपडे, जेडी (एस)चे तात्यासाहेब सीताराम तेले, बसपाचे के. सी. कालुराम विनायक आहे. मात्र, या ठिकाणाहून सुप्रिया सुळे यांची प्रतिष्ठा पणाला आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी
महाराष्ट्रातील आणि देशातील एक नंबरचा मतदार संघ असलेल्या राजापूरचे असित्व संपून नव्याने अस्तित्वात आलेल्या या मतदार संघात उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे विजयी झालेत. त्यांनी दोनवेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा पराभव केला. आता शिवसेनेने प्रभूंच्या ऐवजी विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी नीलेश राणे यांचा विजय सहजासहजी होणार नाही. आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर नाराज झालेत. त्यांनी बंडाचा निशाण फडकवित. नीलेश राणेंना मतदान न करण्याचा निर्णय घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी शिवसेनेला मतदान करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे काँग्रेसपर्यायाने राणेंची गोची झाली आहे. या मतदार संघातून 15 उमेदवार उभे आहेत. त्यामुळे मतांची विभागणी झाली तर राणेंना ही निवडणूक जड जाण्याचे संकेत आहेत.

जयपूर ग्रामीण
जयपूर ग्रामीण येथून ऑलिंपिक नेमबाज कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड याच्यामुळे या मतदार संघाकडे लक्ष लागले आहे. 2004मध्ये त्यांने रजत पदक जिंकले होते. त्याला भाजपकडून मैदानात उतरविण्यात आले आहे. तर त्याच्या विरोधात काँग्रेसचे डॉ सी पी जोशी आहेत. ते ज्येष्ठांपैकी एक आहेत. या दोघांमध्ये टक्कर आहे.

बीड
मराठवाड्यातील या मतदार संघाकडे लक्ष विधले आहे. येथून भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे उभे आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने सुरेश धस यांना उमेवारी दिली आहे. तर गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी काकांची साथ सोडून राष्ट्रवादीशी घरोबा केलाय. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनसेचा उमेदवार दिलेला नाही. त्यापुढे जाऊन गोपीनाथ मुंडेना जाहीर पाठिंबा दिला आहे. मुंडे यांचा येथील विजय सहजासजी शक्य नाही. कारण राष्ट्रवादीने तगडे आव्हान उभे केले आहे.

बाडंमेर
राजस्थानमधील या मतदारसंघात कर्नल सोनाराम चौधरी आणि मेजर जयवंत सिंग यांच्यात टक्कर आहे. भाजपने उमेदवारी न दिल्याने जयवंत सिंग यांनी बंडखोरी करीत आखाड्यात उडी घेतली. त्यामुळे सोनाराम यांना ही निवडणूक तशी सोपी नाही. तर काँग्रेसने हरीश चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. मोदी लाट असल्याने भाजप काय चमत्कार करते याकडे लक्ष आहे. भाजप आणि बंडखोर सिंग यांच्यात खरी लढत आहे.

अजमेर
राजस्थानमधील या मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज आणि स्वर्गीय राजेश पायलट यांचे चिरंजीव सचिन पायलट यांच्यासाठी महत्वाचा आहे. सचिन पायलट राज्याचे अध्यक्ष आहेत. आपली जागा राखण्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यांच्याविरोधात भाजपचे हमनाम सांवर लाल आहेत. मोदी लाटेमुळे येथे चुरस होण्याची शक्यता आहे.

झालावाडा-बारा
मुख्यमंत्री वसुंधरा राजे-सिंधिया यांचा मुलगा दुष्यंत सिंग यांच्यामुळे या मतदार संघाकडे लक्ष आहे. ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. भाजप 1989पासून येथून विजयी होत आहे. 1989-1999दरम्यान, वसुंधरा राजे यांच्याकडे होती. 2004 आणि 2009पासून दुष्यंत यांच्याकडे हा मतदारसंघ आहे. ही जागा भाजपसाठी सुरक्षित आहे. मात्र, काँग्रेसने प्रमोद जैन भाया आणि बसपाने चंद्रा सिंग यांना मैदानात उतरविले आहे.

पिलभीत
उत्तर प्रदेशमधील या मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे. येथे गांधी घराण्यातील सून मनेका गांधी निवडणूक रिंगणात आहेत. येथील विद्यमान खासदार वरुण गांधी आहेत. ते मनेका यांची पुत्र आहेत. मात्र, यावेळी वरुण यांना सुल्तानपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. मनेका यांच्याविरोधात काँग्रेसने संजय कपूर यांना उमेदवारी दिली आहे. तर आपकडून राजीव अग्रवाल, बसपाचे अनीस अहमत आणि सपाचे बुधसेन वर्मा रिंगणात आहेत. त्यामुळे लक्ष आहे. पिलभीत हा मनेका गांधी यांचा सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळख आहे. मनेका या अपक्ष म्हणून येथून याआधी निवडणूक आल्या आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 17, 2014, 16:51
First Published: Thursday, April 17, 2014, 16:59
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?