'त्या' साडे तीन लाख झोपड्या सुरक्षित होणार?

'त्या' साडे तीन लाख झोपड्या सुरक्षित होणार?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

२००० सालापर्यंतच्या झोपड्यांना आता संरक्षण मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. आज मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.

दुसरीकडे, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलंय. अंगणवाडी सेविकांचं मानधन ४०५० वरुन ५००० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर अंगणवाडी सेविका मदतनीसांचं मानधन २००० वरुन २५०० रुपये करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.

नेमकं किती आणि कोणत्या झोपड्यांना संरक्षण मिळणार त्यावर एक नजर टाकूयात....
* मुंबईतील गणतीत असलेल्या एकूण २७ लाख ५० हजार झोपड्या आहेत.
* त्यातील, वर्ष १९९५ पूर्वीच्या १० लाख २५ हजार झोपड्या आहेत.
* वर्ष १९९५ ते वर्ष २००० पर्यंतच्या ३ लाख ५० हजार झोपड्या आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 24, 2014, 11:53
First Published: Monday, February 24, 2014, 11:54
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?