www.24taas.com, झी मीडिया, सिन्नरबलात्कार केलेल्यांना फाशी देणं चुकीचं आहे. या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुलायम सिंगांनी अकलेचे तारे तोडल्यानंतर राज चांगलेच भडकलेत. तुमच्या घरी आया-बहिणी नाहीत का, असा थेट हल्ला चढवत राज ठाकरे यांनी मुलायम सिंग यांच्यावर प्रखर टीका केली.
काहीवेळा मुलांकडून चुकून बलात्कार होतात, म्हणून काही त्यांना फासावर चढवणे योग्य नाही. तसेच बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देणे योग्य नाही, असे धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी एका जाहीर सभेत केले आहे. त्याचे सर्वत्रच पडसाद उमटत आहेत.
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशी देण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार झाला पाहिजे असे मुलायमसिंग यांनी म्हटलंय. केवळ एका चुकीसाठी मुलांना फासावर चढवणे योग्य नसून समाजवादी पक्ष सत्तेत आल्यास आपण कायद्यात योग्य ते बदल करून बलात्कार प्रकरणातील व्यक्तींची शिक्षा सौम्य करू असे मुलायमसिंग यांनी धक्कादायकपणे सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली.
पाहा व्हिडिओ
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 10, 2014, 21:48