Last Updated: Friday, October 21, 2011, 14:34
अरविंद सावंत, उपनेते, शिवसेना अण्णांनी केलेले आंदोलन म्हणजे, एका क्रांतीचा उदय म्हटंल जातं, पण खरचं विचार करता असं जाणवतं की, ही क्रांती होती का म्हणून, कारण की क्रांतीची व्याख्या फार निराळी असते, अण्णांनी सुरू केलेले आंदोलन नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणजे आज फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस विरोधात जी काही लाट उसळली आहे. त्याचं सारं श्रेय अण्णांनाच आहे. परंतु आता अण्णांनी किंवा एकूणच टीम अण्णांनी पुढील पावले फार संभाळून टाकली पाहिजेत.
प्रशांत भूषण यांनी केलेलं विधान नक्कीच विवादास्पद होतं, मारहाण करण्यासारखंच हे विधान होतं, परंतु मारहाण करणं हे काही त्यावरील उत्तर असू शकत नाही, प्रशांत भूषणासारख्या एका वकिलाने असं वक्तव्य करणं अगदीच लाच्छांनास्पद आहे. अण्णांचा आंदोलनाचा आदर आहेच, पण त्यांचा टीम मधील लोकांना असं गैर वागणं अत्यंत चुकीचं आहे. आणि यासाठीच शिवसेनेची ठाम भुमिका आहे, देशाच्या एकसंधपणाला बाधा घालणारे लोकांना अण्णांनी वेळीच दूर करणं गरजेचं आहे.
अण्णाच्या पाठीशी उभं राहून आपल्याला हवी ती मतं रेटण्याचीच ही कामं आहेत. याआधी या भूषणांना कोण ओळखत होतं? त्यांनी केलेलं कोणतं काम असं होतं की जे साऱ्या जगाला परिचित आहे. तरीही अण्णांचा खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. लोकपाल आणि त्यासाठी चालविलेले आंदोलन म्हणजे एक प्रकारचे व्रतच आहे. याचा विसर टीम अण्णांना पडू नये.
मिडीयाने दिलेले अवास्तव महत्त्व याचां फायदा टीम अण्णा घेत असल्याचे दिसून येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाखाली स्वैराचाराचा गप्पा मारणाऱ्या या लोकांना भारताचा एकसंधतेला तडा जाईल असं एकदा देखील वाटलं नाही का? काश्मिरमधील लोकांना काय वाटतं? याचा देखील विचार केला गेला पाहिजे, तेथील लोक आजही पाकिस्तानी दहशतीखाली वावरत आहे. जर सैन्य मागे घेतलं तर सारा गोधळं उडेल यासारखा सोपा विचार करता येत नसेल तर भूषण अजूनही अपरिपक्न आहेत असचं दिसून येतं.
तेव्हा भूषण वक्तव्य करताना विचार करावा, आपण काही बरळत तर नाही ना याचा विचार करावा, नाहीतर अशी मार खाण्याची वेळ नेहमीच येत राहील आपल्यावर.. तेव्हा जरा जपूनच..
शब्दांकन- रोहित गोळे
First Published: Friday, October 21, 2011, 14:34