Last Updated: Sunday, December 16, 2012, 11:34
www.24taas.com,अहमदाबादगुजरातमधील दुस-या टप्प्यातील मतदानाचा प्रचार काल संपला. प्रचार संपत असल्यानं सगळ्याच पक्षांनी काल रोड शोवर भर दिला होता. उद्या सोमवारी दुस-या टप्प्यात ९५ जागांवर मतदान होणार आहे.
उत्तर गुजरात, मध्य गुजरात, भुज आणि कच्छ भागातल्या 95 जागांवर निवडणूक होणार आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नऊ जागांवर लढत आहे. तर तीन जागी मित्र पक्षाशी युती आहे.
मोदींच्या गुजरातमध्ये राष्ट्रवादीला किती संधी आहे, याचविषयी राष्ट्रवादीचे नेते गोविंदराव आदिक यांनी स्पष्ट केलं आहे की, आम्ही गुजरातमध्ये खाते उघडून चांगला जम बसवू. त्यामुळे २० तारखेला होणाऱ्या मतमोजणीकेड लक्ष लागले आहे. मोदी पुन्हा बाजी मारणार का? काँग्रेसचा करिष्मा चालतो का, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
First Published: Sunday, December 16, 2012, 11:34