Last Updated: Wednesday, December 19, 2012, 19:33
www.24taas.com.com, अहमदाबादसोमवारी गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. २० डिसेंबरला लागणाऱ्या निकालाची सगळे आता वाट पाहात आहेत. गुजरातमध्ये यंदा झालेल्या विक्रमी मतदानामुळे सर्व पक्षांनी विचारमंथन सुरू केलं आहे.
या वेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत १३ डिसेंबरला पहिल्याच टप्प्यात ८०%हून जास्त मतदान झालं. तर दुसऱ्या टप्प्यात ७१.३२% मतदान झालं. त्यामुळे या मतदानाचा निकाल काय असेल, यावर काँग्रेसमध्ये मंथन चालू झालं आहे.
दुसरीकडे नरेंद्र मोदींनी मंगळवारी आयोजित केलेल्या मीटिंगमध्येही बरीच चर्चा झाली.
1960साली गुजरातमध्ये भाजपची स्थापना झाली. तेव्हापासून प्रथमच गुजरातमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आहे. 182 जागांवर झालेल्या मतदानाबद्दल सर्वच पक्षांत विचार चालू आहेत. गुजरातमध्ये मायक्रो ऍनेलिसिस करण्यासाठी भाजपने व्यवस्था केली आहे.
First Published: Wednesday, December 19, 2012, 17:24