Last Updated: Thursday, December 20, 2012, 12:49
www.24taas.com, मुबंईमुंबईतील भाजपचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी तर अक्षरश: स्वत: ढोल बडवून बडवून आणि नाचून आनंद साजरा करीत आहेत. ‘हा विजय केवळ मोदी किंवा भाजपचा नाही तर हा विजय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा’.
असं म्हणत किरीट सोमय्या यांनी आपली आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतिशय जल्लोषात येऊन मोदींचा विजय साजरा केला. त्यामुळे काय होणार नक्की? आता मोदी हे भाजपमधून एकमेव पंतप्रधान म्हणून दावेदार ठरणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन आपणच पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मोदींनी भाजपला सत्ता सलग तिसऱ्यांदा मिळवून दिल्याने त्यांच्या पंतप्रधानपदासाठीबाबतची चर्चा पुन्हा खूपच जोर धरू लागली आहे.
First Published: Thursday, December 20, 2012, 12:24