Last Updated: Thursday, December 20, 2012, 12:45
www.24taas.com, अहमदाबाद माझ्या मुलानं भरपूर मेहनत केलीय, त्यानं आता पंतप्रधान व्हावं, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांची आई हिरा बा यांनी दिलीय.
‘माझा मुलगा नक्की पंतप्रधान होणार... माझी छाती अभिमानानं फुलून गेलीय. त्यानं गुजरात जिंकलंय. त्यानं आत्तापर्यंत खूप मेहनत केलीय. पुढेही करण्यासारखं भरपूर काही आहे आणि नरेंद्र इथं थांबणाऱ्यातला नाही’ असं हिरा बा यांनी म्हटलंय.
आज गुजरात विधानसभेचा निकाल लागलाय. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या मणिपूरमधून श्वेता भट यांना जवळजवळ ७० हजार मतांच्या फरकानं पराभूत केलंय.
First Published: Thursday, December 20, 2012, 12:33