Last Updated: Thursday, December 20, 2012, 11:59
www.24taas.com, अहमदाबादगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा गुजरातमध्ये पहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर ट्विट केलं.
त्यांनी म्हटलं आहे की, ‘आता मागे वळून पाहण्यासाठी वेळ नाहीये..’ त्यानंतर लगेचच त्यांनी दुसरं ट्विट केलं की, आता पुढे जाण्याची वेळ आहे. आता त्यासाठी फारच मोठ्या साहसाची, उर्जेची आणि धैर्याची गरज आहे.
नरेंद्र मोदी यांनी जेव्हा १७ तारखेला त्यांच्या मतदार संघातील सानिप येथे मतदान केले त्यानंतर म्हटंले होते की, भाजपला राज्यात जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करेल. आणि सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आरूढ करेल यात संदेह नाहीये...
First Published: Thursday, December 20, 2012, 11:51