तरूणांमध्ये का वाढतोय आर्थराइटिस आजार,arthritis patients

तरूणांमध्ये का वाढतोय आर्थराइटिस आजार

 तरूणांमध्ये का वाढतोय आर्थराइटिस  आजार
www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली

आधुनिक जीवन शैलीमुळे अनेक वेळा आपल्या त्रास होतो, थकवा येतो. पण धावपळीच्या जीवनात या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. पण होणाऱ्या त्रासाला थकवा म्हणून दुर्लक्षित करणे हे चुकीचे आहे. कदाचित हे संधिवाताचे (आर्थराइटिस) लक्षण असू शकते. आजची स्थिती पाहता हा आजार तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

हाडाचे अभ्यासक डॉ. राजेश मल्होत्रा यांनी सांगितले, आजाराच्या जर सहा व्यक्ती असतील तर त्यापैंकी एक ही संधिवाताची व्यक्ती असते. धावपळीच्या जीवनामुळे संधीवाताच्या व्यक्तीचे प्रमाण वाढतच आहे. संधिवातचे प्रमाण वृद्ध लोकांमध्ये अधिक असते. पण हा आजार प्रत्येक वयातील लोकांना होऊ शकतो. त्यामुळे याचा धोका वाढत चालला आहे.

डॉ. मल्होत्रांच्या मते, हा आजार जास्त वेळ बसून काम करणे, चालण्याचे प्रमाण कमी, लठ्ठपणा आणि व्हीटॅमिन डी चे प्रमाण कमी हे आर्थराइटिस होण्याची प्रमुख कारणे आहे. सुरुवातीलाच जर या आजारावर उपचार केले हा आजर टाळू शकतो. मात्र, व्यक्तीला सांध्यामध्ये आतिशय जळ-जळ होत असते. शरीरावर याचा परिणाम दिसून येतो. या आजाराचे मूळ कारण अजून लक्षात आले नाही.

देशात आर्थराइटिसविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १२ ऑक्टोबर हा दिवस विश्व आर्थराइटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. आपण थकवा म्हणून त्या त्रासाकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे खूप मोठे नुकसान होते. ऑर्थोपेडिक डॉ. अशोक राजगोपाल यांच्या मते, या आजारापासून लांब राहायचे असेल तर नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने स्नायू मदबूत राहतात आणि त्याची लवचिकता टिकून राहते. सांध्यांना याचा आधार मिळतो.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 31, 2013, 14:44


comments powered by Disqus