बर्ड फ्लू संसर्गजन्य?, Bird Flu from human to human

बर्ड फ्लू संसर्गजन्य?

बर्ड फ्लू संसर्गजन्य?
www.24taas.com,झी मीडिया, बीजिंग

बर्ड फ्लू या आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रथमच माणसांकडून माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे.

यापूर्वी केवळ बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांचं चिकन खाल्यामुळे बर्ड फ्लू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. किंवा बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे बर्ड फ्लूची बाधा होत होती. मात्र माणसाकडून माणसाला बर्ड फ्लू होण्याची घटना चीनमध्ये घडली आहे.

चीनमध्ये बर्ड फ्लूची लागण मोठ्या प्रमाणावर झाली होती. चीनमधील एक ३२ वर्षीय महिला बर्ड फ्लू झालेल्या आपल्या वडिलांची काळजी घेत होती. मात्र . काळात तिलाही बर्ड फ्लू झाला. बर्ड फ्लू हा अशा प्रकारचा संसर्गजन्य रोग नसल्याचं मानलं जात होतं. मात्र या घटनेमुळे बर्ड फ्लू संसर्गजन्य असल्याचं लक्षात आलं आहे.

एका घटनेमुळे बर्ड फ्लू संसर्गजन्य असल्याचं मानता येऊ शकत नाही, असं ब्रिटिश जर्नलमध्ये म्हटलं आहे. एच७एन९ जंतू माणसाकडून माणसाकडे संक्रमित होत नाहीत. मात्र अपवादात्मक घटनेमध्ये अशा प्रकारचं संक्रमण होऊ शकतं. या घटनेमुळे बर्ड फ्लूचा धोका पुन्हा निर्माण होऊन तो वाढू शकण्याची भीती वाढली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 20, 2013, 19:03


comments powered by Disqus