Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपौष्टिक आणि योग्य मात्रात घेतलेले जेवण हे फक्त प्रयोगशाळेत ठेवलेल्या प्राण्यांसाठी उपयुक्त नसून, मनुष्याला कर्करोग आणि इतर जीवघेणे रोग टाळण्यासाठी प्रभावी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या `न्यू साऊथ वेस्ट विद्यापीठ`चे (यूएनएसडब्ल्यू) संशोधक मारगो एडलर यांनी खाण्याच्या सवयीवर निंयत्रण ठेवल्याने पेशी पुनर्रचना आणि शरीराच्या मज्जातंतू सक्षम ठेवण्यास मदत करते.
हा सिद्धांत प्राण्यांमधील शारिरिक गरज समतोल ठेवण्यास मदत करते. प्राणी रवंथ करतात म्हणून त्यांना जिंवत राहण्यासाठी कमी प्रमाणात अन्नाची गरज असते. मात्र मानवात ही प्रक्रिया गुंतागुतींची आहे असे, एडलर यांनी म्हटलंय.
दीर्घायुष्य होणे हे खाणं, व्यायाम आणि पथ्यं यांचा प्रभाव होऊ शकतो. मात्र खाण्यावर ठेवलेल्या नियंत्रणांमुळे हे मनुष्याला फायदेशीर आहे. तसेच मनुष्याला स्वस्थ आणि दीर्घायुष्यही मिळू शकतं. अभ्यासकांच्या मते, भविष्यात अशी औषधे विकसित होतील, जी या सिद्धांतावर आधारित असतील.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 20, 2014, 17:06