गोळीत लपलाय पासवर्डचा पासवर्ड!, dont worry, tablet will remind your all password

गोळीत लपलाय पासवर्डचा पासवर्ड!

गोळीत लपलाय पासवर्डचा पासवर्ड!
www.24taas.com, झी मीडिया, कॅलिफोर्निया

तुम्ही तुमचा पासवर्ड नेहमी विसरता का? आता चिंता सोडा कारण पासवर्ड लक्षात ठेवण आता होणार आहे सोपं... केवळ एक गोळी तुमचे सगळे पासवर्ड लक्षात ठेवणार आहे. काय आश्चर्य वाटल नां? अहो, आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट आहे ही...

अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात असलेल्या ‘प्रोटियश डिजीटल हेल्थ’ या कंपनीने एक अशा प्रकारची गोळी तयार केलीय, ज्यामुळे आपण पासवर्ड लक्षात ठेवू शकतो. पासवर्ड लक्षात ठेवण्याबरोबरच ही गोळी आपल्या शरीराचे तपमान आणि हालचाली यांच्यावरही लक्ष ठेऊ शकते. या गोळीत रेतीच्या कणाएव्हढी एक सिलिकॉन चिप बसवलेली असते. जेव्हा तुम्ही या गोळीचे सेवन करता त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. ही गोळी खाद्यपदार्थांपासून बनवण्यात आलीय त्यामुळे पचण्यासही सोपी आहे.

या गोळीमध्ये कोणत्याही प्रकारची बॅटरी वापरण्यात आलेली नाही तर त्यात एक स्विच बसवण्यात आलाय. जो पोटातील अॅसिडपासून ऊर्जा निर्माण करतो आणि त्यानंतर चिपला सिग्नल मिळतो. याच्याबरोबर एक पॅचदेखील आहे जो चिपला मिळणाऱ्या डाटाला ‘ट्रांसमिट’ करतो. आपलं शरीर त्या चिपकडून मिळालेल्या सूचनेला ट्रांसमिट करतं आणि ब्लू टूथ असलेल्या मोबाईलमध्ये ही सूचना दिसते. हा पॅच सर्व प्रकारचा डाटा स्टोर करतो.

अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासन आणि युरोप प्रशासनाने २०१० मध्येच या गोळीला हिरवा झेंडा दाखवला होता. परंतु बाजारात मात्र ही गोळी उपलब्ध झालेली नाही. थोड्याच दिवसात ही गोळी बाजारात दाखल होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 25, 2013, 15:49


comments powered by Disqus