उन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी! Get healthy glowing skin this summer

उन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी!

उन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

उन्हाळ्यात त्वचा ऊन, धूळ आणि घामामुळे तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरतात. जगात अशी कोणतीच प्रसाधनं नाहीत जी काही तासांत त्वचेचा रंग बदलतील. मात्र काही असे उपाय आहेत त्यांचा नियमित वापर केल्यानं तुमच्या त्वचेचा रंग उजळू शकेल.

उन्हाळ्यात त्वचेसाठी घ्यावयाची काळजी:

उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबूरस टाकून महिनाभर आंघोळ करावी. त्यामुळे त्वचेचा रंग साफ होतो.
सकाळी उपाशीपोटी गाजरचा रस घ्यावा.

अपचन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या, चहा आणि कॉफीचे सेवन मात्र कमी करा.

दोनवेळेचं जेवण झाल्यानंतर थोडीशी बडीशोप खावी. त्यामुळं त्वचेचा रंग उजळतो.

अजून काही टिप्स :

हळद पॅक, मध-बदाम स्क्रब, चंदन, केसर पॅक, मसुरदाळ पॅक, बेसन पॅक यासारखे पॅक वापरणे केव्हाही चांगलेच.

तसंच त्वचेच्या रंगाबरोबरच त्वचेचा दर्जा, चकचकीतपणा, स्वच्छता, पोत हे घटकही महत्त्वपूर्ण आहेतच, म्हणूनच काळजी घ्या, सुंदर दिसा!



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 24, 2014, 12:56


comments powered by Disqus