Last Updated: Saturday, April 6, 2013, 15:19
www.24taas.com, मुंबई आज 'जागतिक आरोग्य दिना'च्या शुभदिवशी आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी काही विशेष टिप्स. काही अशा टिप्स ज्याने तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल...
१.सूर्यापासून जरा जपून दिवसेंदिवस तपमानात वाढ होत आहे. ज्या सूर्यामुळे सारी पृथ्वी तापत आहे मग त्यापुढे आपली त्वचा कशी वाचणार? त्यामुळे उन्हात बाहेर पडताना नेहमी तोंड स्कार्फने झाका. संपूर्ण अंगाला सन स्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडा.
२. वजनाचा समतोल साधा दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध, चीज आणि क्रीम कमीत कमी खा. त्याचबरोबर लोणी आणि फास्ट फूड खाण टाळावं. कारण ते चरबीयुक्त पदार्थ असतात.
३. आरोग्यास पूरक आहार घ्या आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवा. असे केल्याने तुमच्या आरोग्यात होणारे चांगले बदल तुम्हाला लवकरच जाणवतील. पाण्याचे प्रमाण वाढवा.
४. ताणाला ठोका राम राम आपलं अर्ध जीवन हे तणावाखाली असतं परंतू हाच ताण तुमचं निम्म आयुष्य संपवत. त्यामुळे ताणाचे प्रसंग उदभवताल तेव्हा कोणाकडे तरी मनमोकळ करा. वेळ असेल तेव्हा आपल्या कुटुंबासह कुठेतरी फिरायला जा.
५. नेहमी प्रसन्न राहा नेहमी आरोगी राहण्याचा कानमंत्र म्हणजे व्यायाम. दिवसातून कमीत-कमी ५ मिनिट तरी व्यायाम करावा. व्यायाम करायाला वेळ मिळत नसेल तर जिथे चालत जाण शक्य आहे तिथे चालतच जावं. अथवा संध्याकाळी मुलांबरोबर खेळावं.
६. सकारात्मक विचार करा तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा. हसत राहा कारण हसण्याने तुमच्या मेंदूलाही आराम मिळतो.
७. धूम्रपान तसेच दारू पिणे टाळा धूम्रपान व दारू पिण्याने तुमच आर्युमान कमी होते. धूम्रपान केल्याने नुकताच फुप्फुसाचा कर्करोग ओढवत नाही तर इतर अनेक रोग जडतात.
First Published: Saturday, April 6, 2013, 15:03