Last Updated: Tuesday, August 13, 2013, 09:10
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पावसाळ्याच्या दिवसांत तुम्हाला त्वचेची आणि केसांची काळजी सतावत असेल नाही... भिजायचं तर आहे पण आरोग्याची तर काळजी घ्यायलाचं हवी हेदेखील चिंता आहे. पावसाळ्याच्या दिवसांत प्रवासात तर केसांची अजूनच वाट लागते... आणि मग तुमच्या काळजीतदेखील वाढ होते, होय ना... यासाठीच आम्ही तुम्हाला देत आहोत काही सोप्या टीप्स... ज्यायोगे तुम्हाला तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी जास्त कष्ट पडणार नाहीत.
केसांच्या निगा राखण्यासाठी… - वेगवेगळ्या हेअर स्टाइल करण्यासाठी आपण हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर करतो. पावसाळ्यात यांचा वापर करणं आर्वजून टाळा.
- पावसाळ्यात वातावरणातील ओलावा, आद्र्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात, आठवड्यातून दोनदा केस धुवा तसंच केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा.
- केस धुतल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी कंडिशन करावेत.
- पावसाच्या पाण्यात केस भिजू देऊ नका आणि केस भिजले तरी लगेच धुऊन घ्या.
- पावसाळ्यात हेअर स्ट्रेटनिंग करणं किंवा वारंवार आयर्निग करणं टाळा.
- पावसाळ्यात केस विंचरण्यासाठी मोठय़ा दातांचा कंगवा वापरा. जेणेकरून जास्त केस तुटणार नाही.
- एका लिंबाचा रस काढून तो १५ मिनिटं केसांना लावून ठेवा, त्यांनतर केस धुऊन टाका. केस तेलकट आणि चिकट होणार नाहीत.
- पावसाळ्यात केस शक्यतो खांद्यापर्यंत वाढलेले ठेवावेत.
- पावसाळ्यात ‘ई’ जीवनसत्त्व असलेला आहार घ्या. त्यामुळे तुमचे केस मजबूत राहतील.
- केस ओले असताना ते बांधून ठेवू नका. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊन केसात खाज येऊ शकते. त्यामुळे ओले केस कोरडे करून घ्या. मग बांधा.
- पावसात केसांना आठवडय़ातून एकदा तरी तेल लावून मसाज करा. केसांना पोषणाची आवश्यकता प्रत्येकच ऋतूत असते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, August 13, 2013, 09:10