फक्त एक गोळी... आणि वार्धक्याला सुट्टी!, just one pill & stay young forever

फक्त एक गोळी... आणि वार्धक्याला सुट्टी!

फक्त एक गोळी... आणि वार्धक्याला सुट्टी!
www.24taas.com, मेलबर्न

फक्त एक गोळी... आणि वार्धक्याला सुट्टी! काय, कशी वाटली कल्पना… पण, आता ही केवळ कल्पना राहणार नसून ही गोष्ट प्रत्यक्षात येणार असल्याचा दावा, संशोधकांनी केलाय.

वार्धक्य लांबणीवर टाकणारी एक गोळी संशोधकांनी बनवण्याचा प्रयत्न केलाय. या एका गोळीमुळे माणसाला माणसाला १५० वर्षांपर्यंत आयुष्य जगायला मदत मिळू शकेल, असा दावा त्यांनी केलाय. येत्या पाच वर्षांत ही गोळी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती त्यांनी दिलीय.

वार्धक्याशी संबंधित एन्झाइमवर लक्ष दिल्यास वाढत्या वयातील आजार दूर होण्यास मदत होत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले. उपचार पद्धतीनुसार सर्व ११७ औषधांची चाचणी विशिष्ट एन्झाइमवर करण्यात आली. त्यामुळे वृद्धापकाळ रोखणारी औषधे तयार झाली आहेत, असं ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स मेडिसिन’चे प्राध्यापक डेव्हिड सिनचेअर यांनी म्हटलंय. एसटीआरटी-१ एन्झाइम प्रतिबंधित कॅलरी व व्यायामातून मिळवता येते. मात्र, ते उत्प्रेरकांमधूनही प्राप्त करता येते. रेड वाइनमधून नैसर्गिक उत्प्रेरक मिळते. मात्र कृत्रिम पद्धतीने उत्प्रेरक विकसित होत आहे. प्राण्यांवरील प्रयोगात लठ्ठ उंदराला कृत्रिम ‘रिझव्हरट्रोल’(उत्प्रेरक देणारा घटक) दिल्यानंतर तो सडपातळ उंदरापेक्षा दुप्पट वेगाने धावतो तसेच १५ पट जास्त जगत असल्याचे दिसून आले आहे.

जीवनमान वाढवणाऱ्या या औषधामुळे कॅन्सर, अल्झायमर व टाइप-२ मधुमेह आजार रोखला जाऊ शकतो. संबंधित रोगांवरील औषध केवळ एकाच आजारावर उपयोगी ठरू शकते. सध्या विकसित होत असलेली औषधी अन्य २० रोगांवर इलाज करू शकते, असे सिनचेअर यांनी म्हटले आहे.

First Published: Tuesday, March 12, 2013, 10:52


comments powered by Disqus