Last Updated: Wednesday, August 14, 2013, 08:10
www.24taas.com, झी मीडिया, लंडन ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदा ‘डेथ टेस्ट’ नावाचं एक तंत्रज्ञान विकसीत केलंय. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं एखादी व्यक्ती किती दिवस जगणार हे समजू शकणार आहे. लंकास्टर युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापका एनेटा स्टेफनोवस्का आणि पीटर मॅक्किलंटोक यांनी या तंत्रज्ञानाचं पेटंट रजिस्टर केलंय.
या टेस्टमध्ये घड्याळासारख्या एका उपकरणाच्या साहाय्याने त्वचेच्या वरच्या भागाव पीडारहीत लेजर पल्स सोडले जातात. हे पल्स एन्डोथिलियल पेशीचं विश्लेषण करू शकतात. त्यामुळे वयोमानानुसार शरीर तुमची सोबत केव्हा सोडेल हे सांगता येणं शक्य झालंय.
‘द संडे टाइम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, एन्डोथिलियल पेशी वास्तवात छोट्या सूक्ष्म रक्त वाहिन्यांचा वापर कवचाप्रमाणे करतात. शरीराच्या कोणत्याही भागावर झालेल्या जटील गतिविधींवर या पेशी ताबडतोब प्रतिक्रिया व्यक्त करतात.
या पेशींच्या आत होणाऱ्या बदलांना जाणून घेऊन मरणापूर्वी वेळेची गणना केली जाऊ शकते. ही टेस्ट कॅन्सर आणि डिमेन्शियाचीही माहिती देऊ शकते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, August 14, 2013, 08:01