लिंबूपाणी प्या.. सदैव निरोगी राहा, lemonwater is best source of good health

लिंबूपाणी प्या.. सदैव निरोगी राहा

लिंबूपाणी प्या.. सदैव निरोगी राहा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शरीरासाठी र्नेसर्गिक आणि उत्साहवर्धक पेय म्हणजे लिंबूपाणी. सदोदित ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले. लिंबूमध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. शरीरासाठी आवश्यक असणारी क जीवनसत्वाची कमतरता लिंबूपाणी सेवनाने भरून काढता येते
.
लिंबूपाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच पोटॅशिअमचीही गरज पूर्ण होते. पोटॅशिअमुळे आपल्या मेंदूला फायदा होतोच आणि ब्लडप्रेशरवरही ताबा ठेवता येतो. तुम्हाला जर चहा कॉफीची सवय कमी करायची असेल तर लिंबूपाणी उत्तम.

लिंबूपाणी सेवनाचा आणखी एक फायदा तो म्हणजे रक्तशुद्धी ज्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होतेच आणि शरीर ताजेतवाने राहते. जीवनसत्वाने भरपूर आणि लाभदायक असे हे लिंबूपाणी कधीही सेवन केले तरी चालते मात्र रात्री जेवणानंतर घेऊ नये. हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 9, 2013, 12:02


comments powered by Disqus